गावागावातुन

काठापूरचा शेतकर्याचा मुलगा झाला फौजदार

Published

on

मंचर- काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील अनिकेत सुशिला चंद्रकांत करंडे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२३ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवित फौजदार पदाला गवसणी घातली. तो गावातील पहिला पुरुष अधिकारी तर गावातील दुसरा अधिकारी ठरला आहे.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनिकेत करंडे याने ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळवले. काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप येथे त्याचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर आठवी ते दहावीचे शिक्षण संगमेश्वर विद्यालय पारगाव, तर पुढे मेकॅनिकल इंजिनियर च शिक्षण व्ही आय.टी.पुणे येथुन पुर्ण केले.शिक्षण पुर्ण झाल्यावर अनेक कंपण्यांमध्ये कामाची संधी असतानाही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन अधिकारी होण्याची ईच्छा असल्याने त्या नंतर त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. होता. कोणत्याही संस्थेत अभ्यास न करत स्वताहाच अभ्यास करून पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत यश मिळवले.अनेकांनी नोकरी कर नोकरीची चांगली संधी आहे. या अवघड परीक्षा देऊ नको अपयश येण्याची जास्त शक्यता आहे.असे सांगितले. परंतु आपल्या ध्येयावर ठाम राहुन त्याने हे यश मिळवले आहे.


त्याला पी.एस.आय.विक्रम कर्डीले यांचे मार्गदर्शन मिळाले. शेतकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या अनिकेतची आई सुशिला व वडील चंद्रकांत करंडे शेती करुन आपले कुटुंब चालवत आहेत. त्याने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुणांना मार्गदर्शक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version