गावागावातुन
काठापूर बुद्रुक येथील विहिरीवरील दोन मोटारींची केबलची चोरी. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय मनस्ताप.
निरगुडसर-काठापूर बुद्रुक ता.आंबेगाव येथील पांडुरंगवस्ती या ठिकाणी दोन विहिरीवरील दोन मोटारींची केबलची चोरी झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.केबल चोरी झाल्याने मोटारी बंद राहनार आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे. नदीकाठच्या मोटरींची केबल चोरीच्या घटना होत असताना आत्ता विहिरीवरच्या मोटारिंच्या केबल चोरी होऊ लागल्याने शेतकरी वैतागला आहे.
काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव येथील पांडुरंगवस्ती या ठिकाणचे शेतकरी अनिल दत्तात्रय जाधव व विष्णू सखाराम जाधव यांच्या विहिरी वरील विज पुरवठा करणाऱ्या केबलची चोरी झाली आहे. दोन शेतकऱ्यांची 40 फूट लांबीच्या केबल चोरी झाल्याने या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे केबल चोरी झाल्यामुळे नवीन केबल आनेपर्यंत मोटारी बंद राहिल्याने शेती पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळे निर्माण झाला आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात केबल चोरी झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.