गावागावातुन
पोंदेवाडी येथील गडदादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग.
निरगुडसर -पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील गडदादेवी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये पुणे आणि नगर जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवून. प्रेक्षणीय कुस्त्या केल्या.
श्री गडदादेवी यात्रा उत्सवानिमित्त पोंदेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बैलगाड्यांच्या शर्यती बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच कुस्त्यांच्या आखाड्याचे हे आयोजन केरण्यात आले होते. यावेळी आयोजित आखाड्यामध्ये एकुण ५५ हजार रुपये बक्षीसाचे वाटप करण्यात आले.
एक नंबर कुस्तीसाठी 11 हजार रुपये दोन नंबर कुस्तीसाठी ९ हजार रुपये,तिन नंबरची कुस्ती ७ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. यावेळी पुणे ,पारनेर ,नगर,राजगुरुनगर नारायणगाव,जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील पैलवान सहभागी झाले होते.पंच म्हणून राजेंद्र पाबळे यांनी काम पाहीले
या आखाड्यात अनिल वाळुंज,संदिप पोखरकर,जयसिंग पोंदे,सुशांत रोडे, महिंद्र पोखरकर,निखल पोंदे,अशोक दुगड,अशोक वाळुंज,राहुल घोलप, प्रवीण पडवळ,आनंदा पोंदे,सदाशिव रोडे,पोपट रोडे,संतोष वाळुंज,नानाभाऊ पोखरकर, अमोल वाळुंज,अर्जुन महाराज वाळुंज,सुनिल घोलप,चंद्रकांत विरकर यांनी नियोजन पाहिले