गावागावातुन
लोणी (ता. आंबेगाव) येथे अंगणवाडी बांधकामाचे भुमिपुजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते संपन्न.
लोणी (ता. आंबेगाव) येथे अंगणवाडी बांधकामाचे भुमिपुजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते पार पडले.माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून व जि.प.माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लोणी येथील नवीन अंगणवाडी बांधकामासाठी १२.५० लाख रुपये निधी मंजुर करण्यात आला होता.
लोणी ता आंबेगाव येथे नवीन अंगणवाडी इमारतीच्या भूमिपूज बांधकामासाठी १२.५० लाख रुपये मंजुर करण्यात आले होते. त्याचे भूमिपूजन खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी बाळशिराम वाळुंज, माजी सरपंच रंजना लंके, शरद बँकेचे संचालक अशोक आदक,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कैलास गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राष्ट्रवादी महीला काँग्रेस अध्यक्षा गीतांजली लंके, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कोचर, मंगल गायकवाड,पुष्पा रोकडे, राजेंद्र वाळुंज, राहुल आढाव विजय आढाव, भारतीय जनता पक्षाचे हर्षल सुतार, प्रकाश सिनलकर , बाळासाहेब गायकवाड, मनोहर वाळुंज, बाबुराव वाळुंज,अंगणवाडी सेविका शैला क्षिरसागर, मनिषा वाळुंज, पुनम वाळुंज उपस्थित होते.