गावागावातुन
शिंगवे येथे मेंढपाळांना वनविभागाच्या वतीने तंबू व सौर दिव्यांचे वाटप.
मंचर :शिंगवे ( ता.आंबेगाव) येथे मेंढपाळांना वनविभागाच्या वतीने सुरक्षा तंबू व सौर दिव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
जुन्नर वनविभागाकडून बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. केवळ जनजागृतीच नाही तर प्रत्यक्षात थेट मदत करून बिबट्यांपासून संरक्षण होण्यासाठी ज्या ज्या आवश्यक उपाय योजना राबवल्या जात आहेत . जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या संकल्पनेतून मेंढपाळ बांधवांना हे सुरक्षा तंबू व सौरदिव्यांचे वाटप केले जात आहे.
शिंगवे येथे मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या हस्ते मेंढपाळांना साहित्याचे वाटप करण्यात आले.भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, पोलिस पाटील गणेश पंडित ,सुदामराव वाव्हळ, प्रकाश वाव्हळ, सोसायटीचे अध्यक्ष भरत गाढवे, कैलास गोरडे,
, शारदा राजगुरव, दत्तात्रय राजगुरव आदी मान्यवर ,वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी प्रदिप कासारे, सोनल भालेराव, वनरक्षक बालाजी पोतरे, दिव्या शिवशरण, आश्विनी डफळ आदी मान्यवर, वनकर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी वनपरिक्षेत्रधिकारी विकास भोसले म्हणाले ” बिबट्यांपासून भविष्यात उद्भवणाऱ्या ज्या घटना आहेत . त्यांना आळा बसणे ,बिबट्या पासून संरक्षण कसे करावे? त्याच्या उपाययोजना त्यानंतर स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावयाची आहे . मेंढपाळांना जे तंबू व सौर दिवे दिले आहे त्याचा वापर योग्य झाला पाहिजे. त्याचा वापर कुटुंबासाठी झाला पाहिजे,स्वसंरक्षणासाठी झाला पाहिजे.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वन परिमंडळ अधिकारी धामणी सोनल भालेराव यांनी केले.