गावागावातुन
लोणीतील ओढ्यावर बांधला सिमेंटचा बंधारा.शेतीसाठी होनार फायदा.

निरगुडसर:-लोणी (ता.आंबेगाव) येथील बागवस्ती ओढ्यावर स्मशानभूमी शेजारी गेटकेन सिमेंट बंधारा बांधण्यात आला असून यासाठी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून जलसंधारण विभागा अंतर्गत ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यात पाणी साठवणीमुळे परिसरात शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद गट प्रमुख खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गण प्रमुख बाळशिराम वाळुंज, शरद सहकारी बँक संचालक अशोक आदक, माजी सरपंच रंजना लंके, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणी अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा,गीतांजली लंके, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कोचर, मंगल गायकवाड, पुष्पा रोकडे, राजेंद्र वाळुंज, राहुल आढाव, सामाजिक कार्यकर्ते विजय आढाव, भारतीय जनता पक्षाचे हर्षल सुतार, प्रकाश सिनलकर, बाळासाहेब गायकवाड, मनोहर वाळुंज, बाबुराव वाळुंज उपस्थित होते.