गावागावातुन
मांदळेवाडीत बैलगाडा शर्यतीच्या घाटाचे भूमिपूजन.अनिल वाळुंज यांच्या हस्ते संपन्न.

निरगुडसर:-मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बांधकामाचे भूमिपूजन आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या फंडातून येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या बांधकामासाठी दहा लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. याप्रसंगी सरपंच उज्ज्वला आदक, उपसरपंच लता आदक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बाबू आदक, बाळशिराम वाळुंज, रवी ढगे, योगेश करंडे, वैशाली पालेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष विजय आदक, उपाध्यक्ष सचिन आदक, काळूराम पालेकर उपस्थित होते.
घाटासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या विजय आदक, सुरेश आदक, संतोष आदक, महादू आदक, दशरथ आदक, खंडू फकिरा आदक, फकिरा आदक या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आंबेगाव तालुक्यात गावोगावी ग्रामदैवतांच्या यात्रेला बैलगाडा शर्यती आयोजित केल्या जातात त्यासाठी चांगल्या बैलगाडा घाटाची आवश्यकता असते.त्यामुळे बैलगाडा घाट चांगला असावा अशी प्रत्येक गावची इच्छा असते.त्यामुळे बैलगाडा घाट बांधून घेण्याकडे गावांचा कल असतो त्यामुळे मांदळवाडी येथे बैलगाडा घाटाचे काम करण्यात येत आहे.