गावागावातुन

भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” प्रदान

Published

on

मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, यांचा सन २०२३-२४ करीता मध्य विभागातील “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार” देशाचे माजी कृषीमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


गुरुवार (दि. २३) वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, मांजरी बु., येथे ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राज्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना सन २०२३-२४ गाळप हंगामासाठी सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना, सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कर, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कर, शेतकरी ऊस भूषण पुरस्कार, सहकारी साखर कारखान्यांचे अधिकारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचे संचालक मंडळ व महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे यांनी स्विकारला.
याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात व परिसरात ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस बेणेबदल आणि बेणेमळा योजनेवर भर, एक डोळा पध्दतीने ऊस रोप लागवड, शेतकरी मेळावे व प्रशिक्षण यांचे आयोजन, माती व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, ठिबक सिंचन वाढीसाठी प्रयत्न, हुमणी किड नियंत्रणासाठी भुंगेरे गोळा करणे, व्हि.एस.आय. निर्मित निविष्ठाचा वापर, जैविक खते निर्मिती प्रकल्पामार्फत जैविक खते पुरवठा, रासायनिक खतांचा पुरवठा, खोडवा पीक व्यवस्थापन, पाचट कुट्टी करणेसाठी विशेष प्रयत्न, ऊस विकास योजनेसाठी भरीव रक्कमेची तरतुद, दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ या स्वतंत्र ऊस विकास योजनेची मागील ६ वर्षापासून अंमलबजावणी या सर्व बाबींचा विचार करुन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु यांनी गाळप हंगाम २०२३-२४ करीता सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार देण्यात आला आहे.
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले असल्याची माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version