गावागावातुन
अज्ञाताने कांदापिकावर तणनाशक फवारले.यामध्ये दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे या शेतकऱ्याचे जवळपास २० गुंठे क्षेत्राचे नुकसान.
मंचर :-वळती (ता.आंबेगाव ) येथील शिवडी मळ्यात गरीब शेतकऱ्याच्या कांद्यावर अज्ञात समाजकंटकाने पंधरा दिवसांच्या कांद्यावर तणनाशक फवारले.यामध्ये दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे जवळपास २० गुंठे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी (दि.२०) उघडकीस आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,वरती गावाच्या पूर्वेला काटवान वस्तीच्या पुढे शिवडी मळा आहे.तेथे दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे हे शेतकरी राहतात.या शेतकऱ्याने बाळू गणा लोखंडे या शेतकऱ्याच्या शेतात पंधरा दिवसांपूर्वी अर्धलीने दीड एकर कांदा लागवड केली होती. त्यापैकी अंदाजे २० गुंठे क्षेत्रात तीन-चार दिवसांपूर्वी अज्ञात समाजकंटकाने कांद्यावर तणनाशक फवारले.त्याचा परिणाम रविवारी (दि.१९) दिसून आला.शेतातील कांदे जळून गेल्यासारखे दिसू लागले.दशरथ लोखंडे ,किरण लोखंडे यांनी वळती गावातील कृषी सेवा केंद्राच्या तज्ञांना बोलवून घेऊन कांदा पिकाची पाहणी केली.
कांदा पिकावर तणनाशक फवारल्याचे त्यांनी सांगितले.दशरथ ज्ञानेश्वर लोखंडे या शेतकऱ्याची यापूर्वी देखील पाईप लाईनची नुकसान अज्ञाताने केलेली आहे.लागवड केलेले कांदे जळून चालले आहेत.
वळती (ता.आंबेगाव ) येथील शिवडी मळ्यात अज्ञाताने कांदा पिकावर तणनाशक फवारून नुकसान केले.