गावागावातुन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथील मुलींनी तालुका स्तरावर मिळवीले घवघवीत यश.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी- यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा 2024- 25
जिल्हा परिषदेअंतर्गत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक येथील मुलींनी तालुका स्तरावर घवघवीत यश मिळवले आहे.


लांडेवाडी येथे झालेल्या तालुका स्तरावरील स्पर्धेत –
कुमारी ईश्वरी श्रीकृष्ण ढेरंगे इयता .६वी हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीला तिला निलीमा वळसे व दिनेश तुळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर
कुमारी गायत्री अविनाश पवार इ यता ७वी हिने थाळी फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तीला सुरेश भागवत व उत्तम वाव्हळ या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.


दोन्ही मुलींची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांनी दिली. यशस्वी विद्यार्थिनींचे गावातील सर्व ग्रामस्थ व विविध संस्थानी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version