गावागावातुन

काठापूरमधील चोरीला गेलेल्या गाय-म्हैसीचा अखेर शोध.पारगाव पोलिसांना मोठ यश.

Published

on

मंचर : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील सतीश सूर्यभान ढोबळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून गाय आणि म्हैस चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव कारखाना पोलिसांनी पकडले, तसेच चोरीस गेलेली गाय आणि म्हैस फिर्यादी ढोबळे यांना परत केली.

पारगाव (कारखाना) पोलीस स्टेशन (ता.आंबेगाव) येथे फिर्यादी सतिष ढोबळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून ११ डिसेंबर २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गाय व म्हैस चोरून नेली होती. या प्रकरणी १४ डिसेंबर २०२४ रोजी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास करीत असताना पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अजित मडके, शांताराम सांगडे, पोलिस नाईक रमेश इचके, पोलिस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना सराईत आरोपी पद्माकर ऊर्फ नागेश शांताराम मोरे (रा. कळंबवाड, ता. मुरबाड, जि. ठाणे) याच्यावर शिरूर, रांजणगाव पोलिस ठाणे येथे जनावरे चोरीचे गुन्हे दाखल असून तो शिरूर परिसरामध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने सापळा रचून पद्माकर यास ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा त्याचा साथीदार नरेश भाऊ मोरे (रा. कळंबवाड) या साथीदाराच्या वाहनामधून केल्याचे सांगितले. परंतु, चोरी केलेली जनावरे कोठे आहेत,याबाबत तो काही एक उपयुक्त माहिती देत नसल्याने त्यास या गुन्ह्याच्या कामी अटक केली. न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याच्याकडून चौकशी केली असता फरारी आरोपी नरेश याच्या घराजवळ चोरी केलेली
जनावरे दाखविली. ती फिर्यादी यांनी ओळखली. फरार आरोपी नरेश मोरे याची पत्नी मनीषा हिच्या समक्ष दोन्ही जनावरे पंचनाम्याने पंचासमक्ष ताब्यात घेतली.व ती जनावरे फिर्यादी मुळ मालक सतीष ढोबळे यांच्या ताब्यात दिली.ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version