गावागावातुन

थापलिंग यात्रा उत्साहात संपन्न भरयात्रेच्या दिवशी धावले २२९, दोन दिवसात धावले ४६२ नवसाचे बैलगाडे भीर्र…… झाली…… पहाडी आवाजाने थापलिंग गड दुमदुमला .

Published

on

मंचर प्रतिनिधी -नागपूर (ता.आंबेगाव) येथील थापलिंग यात्रा उत्साहात शांततेत संपन्न झाली. भरयात्रेच्या दिवशी मंगळवारी २२९ नवसाचे बैलगाडे धावले.दोन्ही दिवसांमध्ये एकूण ४६२ बैलगाडे धावले. भीर्र . . . . झाली ,….. ” उचल की टाक “या पहाडी आवाजाने थापलिंग गड दुमदुमून गेला. यात्रेच्या दोन्ही दिवसात दोन लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले.
मंगळवारी (दि.१४) भर यात्रेच्या दिवशी सकाळपासूनच गडावर भाविकांची गर्दी झाली होती. बैलगाडा घाटात दुतर्फा बैलगाडा शौकीनांची नवसाचे बैलगाडे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा मालकांच्या बाऱ्या यंदा शौकीनांना पाहायला मिळाल्या. भीर्र ……झाली…… उचल की टाक!या पहाडी आवाजाने थापलिंग गड अक्षरक्षः दुमदुमून गेला.
थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दोन्ही ही दिवस बैलगाडा घाटात बैलगाडा मालकांचे, शौकीनांचे स्वागत केले.यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी नागापूर गावचे सरपंच गणेश यादव, उपसरपंच सुनील शिंदे, यात्रा ट्रस्ट, ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version