गावागावातुन
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता.आंबेगाव ) येथील श्री .क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.यात्रेच्या पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.
निरगुडसर प्रतिनिधी-पौष पौर्णिमेनिमित्त पुणे जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागापूर (ता.आंबेगाव ) येथील श्री .क्षेत्र थापलिंग खंडोबा देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.यात्रेच्या पहिल्या दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले. “सदानंदाचा येळकोट ” भैरवनाथाचं चांगभलं “असा जयघोष करत भाविकांनी तळीभंडार केला.
थापलिंग गडावर सोमवारी (दि .१३ )पहाटे खंडोबा देवाची पहाटे विधीवत पूजा व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी थापलिंग गडावर चोहोबाजूंनी भाविक येण्यास प्रारंभ झाला.दुपारी १२ नंतर भाविकांची गर्दी वाढली.थापलिंग गडावर भाविकांनी येऊन कुलदैवताचा कुलाचार म्हणून वाघे मंडळींकडून जागरण गोंधळ पूर्ण करून घेतला. “सदानंदाचा येळकोट ” भैरवनाथाचं चांगभलं “असा जयघोषात लाखो भाविकांनी तळी भंडार केला. व खोबऱ्याची उधळण केली.दुपारी दोन वाजता वळती, रांजणी, शिंगवे, येथील खुडे बंधूंच्या मानाच्या काठी पालख्यांचे पारंपारिक वाद्यांच्या गजरात गडावर आगमन झाले.दिवसभरात जवळपास एक लाखाहून अधिक भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले .
थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ , तरुण, युवक यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
थापलिंग गडावर खंडोबा देवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.या मंदिराच्या कामासाठी भाविक भक्तांनी सरळ हाताने मदत करावी. असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पौष पौर्णिमेनिमित्त नागापूर (ता. आंबेगाव )येथील श्री क्षेत्र थापलिंग यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.तळी भंडार करण्यासाठी मंदिराभोवती भाविकांनी केलेली गर्दी.