शेतीशिवार

पारगाव (शिंगवे) येथील लबडे मळ्यात विहिरीत पडुन बिबट्याच्या बछड्याचा मृतु.

Published

on

निरगुडसर प्रतिनीधी– पारगाव (शिंगवे) ता.आंबेगाव येथील लबडेमळ्यामध्ये पारगाव – जारकरवाडी रस्त्याकडेला असणार्या सुगंध पोंदे व आगंद पोंदे यांच्या मालकीच्या विहिरीत बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला आहे. या बिबट्याचे वय साधारणपणे 2 ते 3 महिने इतके असुन विहिरीच्या बाजुला असलेल्या मातीच्या व दगडाच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना अचानक बाजूनेच जाणाऱ्या रस्त्यावरून वाहनाचा आवाज अथवा प्रकाश पडल्याने बिबटया विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वनरक्षक साईमाला गिते यांनी व्यक्त केला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मोठ्या प्रमाणावर शेती बागायती असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊस पिकाची लागवड केली जाते.सध्या उसतोडणी सुरु झाल्याने उसाच्या शेतात राहनारे बिबटे निदर्शनास येत आहेत.सध्या मानवी वस्ती लगत बिबटे भटकताना दिसून येतो आहे. ही विहीर देखील मानवी वस्ती लगतच असुन या बिबटया सोबत मादी, अजुन एखादे पिल्लु असल्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version