मनोरंजन

आंबेगाव तालुक्यातील नाट्य व भारुड परंपरा जतन करणाऱ्या मंडळांचा स्वराज्य कलाकार महासंघा तर्फे पुरस्कार देऊन सन्मान.

Published

on

मंचर प्रतिनिधी- सध्याच्या दूरचित्रवाणी, यूट्यूब,थेटर, सोशल मीडिया,मोबाईल च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली असतानाही नाटक आणि भारूडाची परंपरा जतन आणि संवर्धन करण्याचे काम आंबेगाव तालुक्यात केले जात असून. नाट्य व भारुड परंपरा जतन करणाऱ्या मंडळांचा सन्मान करून स्वराज्य कलाकार महासंघाने या मंडळाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली असून. या पुरस्काराच्या माध्यमातून नक्कीच पुढील काळामध्ये ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी नाट्य भारुड मंडळांना प्रेरणा मिळेल व ग्रामीण भागातील नाट्य भारुड चळवळ पुढील काळातही चांगल्या स्वरूपात सुरू राहील असे मत सिने दिग्दर्शक विजय शिंदे यांनी व्यक्त केले.

मंचर (ता.आंबेगाव) या ठिकाणी शरदराव पवार सभागृहामध्ये स्वराज्य कलाकार महासंघाच्या वतीने आंबेगाव जुन्नर खेड तालुक्यातील लोककलाकारांचा स्वराज्य कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अभिनेते काळूराम ढोबळे, सुधाकर पोटे, सीमा पोटे, संस्थेचे अध्यक्ष रामदास करंडे, उपाध्यक्ष हुसेन शेख, गुलाबराव वळसे, कांचन टेके, आदिनाथ थोरात, विशाल करंडे ,शशिकांत वाघ,विजय साळवी, नीलिमा वळसे,नवनाथ वाघ, यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील लोक कलाकारांना व्यासपीठ मिळवुन देण्यासाठी आणि लोककलांचे जतन व संवर्धन होण्यासाठी. लोककलाकार यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी. स्वराज्य कलाकार महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण भागातील लोककलावंतांचा सन्मान आणि सत्कार व्हावा यासाठी स्वराज्य कलाकार महासंघाने स्वराज्य कलागौरव पुरस्काराचे आयोजन केले होते. यावेळी आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या कार्यरत असनार्या नाटकाची परंपरा जपणाऱ्या नाट्य मंडळांचा व भारुड परंपरा जपणाऱ्या भारुड मंडळांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लोककलेचे जतन व संवर्धन करण्याचे काम करणाऱ्यासीमा पोटे व सुधाकर पोटे यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी.रामदास सैद,राजेंद्र गुंजाळ, कैलास करंडे,रमेश खुडे,विकास वायाळ,सिद्धेश थोरात,तुषार गावडे,अमित कातळे,निलेश पडवळ,अविनाश वाघ या तालुक्यातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गायन, संगीत,वादन,निवेदन क्षेत्रात काम करणार्या कलाकारांना पुरस्कार देऊन संस्थेच्या वतीने सन्मानीत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास करंडे, स्वागत नीलिमा वळसे, सूत्रसंचालन विशाल करंडे तर आभार हुसेन शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version