गावागावातुन
काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजीत स्पर्धेत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग.
पारगाव शिंगवे-काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे पारगाव केंद्राच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांत दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती केंद्रप्रमुख कांताराम भोंडवे यांनी दिली.
स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी भिमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे,रोहिदास तुळे,अशोक जोरी,विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन,कुंडलिक जोरी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राहुल भुरके, उपाध्यक्ष काळुराम टींगरे,पंढरीनाथ करंडे,कैलास टिंगरे,सोपान करंडे,पंढरीनाथ जोरी,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,विविध शाळांतील शिक्षक ,संतोष लबडे, राजू जाधव,मच्छिंद्र काळे,दत्ता डोळस पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन लहान गटात इ. १ ली व २ री, इ. ३ री व ४ थी आणि मोठ्या गटात इ. ५ वी ते इ. ८ वी स्वरूपात करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, उंच उडी, लांब उडी, वक्तृत्व, लिंबू चमचा, बेडूक उड्या, वेशभूषा, गोळाफेक, थाळीफेक, तसेच सांघिक क्रीडा प्रकारात बडबडगीत, कविता गायन, भजन, प्रश्नमंजुषा, कबड्डी, खो-खो, लोकनृत्य, लेझीम, लंगडी आदी स्पर्धा
पार पडल्या.
या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कला व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. सर्व स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षक सुरेश भागवत , उत्तम वाव्हळ , दिनेश तुळे , सुरेश माने, विजय थोरात,रामरास उंडे ,निलिमा वळसे यांनी परिश्रम घेतले.मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सरपंच अशोक करंडे,विशाल ,राहुल भुरके यांनी शुभेच्छा दिल्या तर दिनेश तुळे यांनी आभार मानले.