गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे उसाला लागलेल्या आगीत दहा एकर उस जळाला, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.
लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे
काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीमध्ये 10 एकर उस जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी माघणी शेतकर्यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारांमधे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली यामध्ये शेतकरी पियुष गांधी, गणपत कांबळे, दत्तात्रय कांबळे, कांताराम कांबळे,मधुकर कांबळे भिवाजी कांबळे ,शिवाजी कांबळे,कौसाबाई करंडे व ईतर शेतकऱ्यांच्या शेतातील उस जळून गेला आहे.ही शेती एकमेकाला लागून असून.या सर्वच 10 ते 12 एकर मधील क्षेत्रावर उसाचे पीक होते.या ठिकाणी दुपारी अचानक विज तारांमध्ये घर्षण होत ऊसाला आग लागली.यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाला असून शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे व शेतकऱ्यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक या ठिकाणी एमएससीबी विभागाचे सब स्टेशन आहे या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो त्यामुळे काठापूर बुद्रुक गावात मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारा पसरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी विज तारांची उंची कमी आहे. तर काही ठिकाणी तारांना झोळ आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या अनेक घटना घडत असतात. माघील एक महिन्याभरापूर्वी ही अशीच आगली होती.महिनाभर पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याने 10 एकर क्षेत्रावरील उस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तोडणीला आलेला ऊस वाया जाणार आहे. साखर कारखाने अजूनही एक ते दीड महिन्यात सुरू होणार नाही त्यामुळे ऊस कारखाना हा उस तोडून नेणार नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सदर ठिकाणी तलाठी जितेंद्र शेजुळ,यांनी पंचनामा केला.यावेळी बिट अंमलदार ए.बी.मडके,एम.एस.ए.बी विभागाचे अधिकारी, भिमाशंकर कारखान्याचे अधिकारी, पोलीस पाटील अमोल करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे उपस्थित होते.