गावागावातुन
डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडावे, शेतीपिके पाण्याअभावी सुकू लागली.
लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे
आंबेगाव शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिके सुकु लागली असुन या पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असून हुतात्मा बाबू गेणू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी खरेदी विक्री संगाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.
माघारी मान्सूनचा पाऊस आंबेगाव शिरूर तालुक्यामध्ये बरसला नाही पाऊस न आल्याने शेती पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे .अनेक ठिकाणी विहिरी ,तळे, नदी यावरून पाणी उपसा करून शेती पिकांना दिले जात आहे. परंतु डिंभे धरणाच्या उजव्या कालव्या खालील गावांमध्ये अनेक ठिकाणी विहिरींची पाणी पातळी कमी आहे.त्यामुळे या ठिकाणच्या गावातील पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यावर आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील अनेक गावे बागायती झाली आहेत. या ठिकाणी अनेक तरकारी पिके, जनावरांची चारा पिके तसेच उसासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. परंतु सध्या पाण्याची गरज भासत आहे.पावसाने ओढ दिल्याने पिके सुकु लागली आहेत अनेक ठिकाणी विहिरींची सुद्धा पाणी पातळी कमी आहे.त्यामुळे एकंदरीत या परिसरामध्ये पाण्याची गरज निर्माण झाली असून. उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी अनिल वाळुंज यांनी केली आहे.