गावागावातुन
आंबेगाव शिरूर तालुक्यातील राहिलेले पाण्याचे प्रश्न पुर्णपणे सोडवले जातील. प्रत्येक गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल -दिलीपराव वळसे पाटील.
मंचर प्रतिनिधी
मला येथील जनतेने 1990 साली वयाच्या 34 व्या वर्षी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली .त्यावेळी परिस्थिती अवघड होती. तालुक्यातील अनेक लोक तालुक्याबाहेर रोजगार मिळवण्यासाठी जात होते. आज परिस्थिती बदलली आहे शिरूर तालुक्याला सगळ्या नद्यांवरील धरणांचे पाणी येत आहे .शिरूर तालुका बागायती झाला त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका बागायती झाला आंबेगाव शिरूर तालुक्यात फेरफटका मारल्यानंतर येथे झालेली प्रगती लक्षात येते.येथे झालेला बदल दिसून येतो पाण्यामुळे आंबेगाव शिरूर तालुक्यात सुबत्ता आली तालुक्याचा चेहरामोहरा बदलला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर सरकारी योजना मोठ्या प्रमाणावर आणल्या.असे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.
मंचर तालुका आंबेगाव या ठिकाणी शिरूर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याआधी आयोजित केलेल्या सभेत वळसे पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भाजपचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे निरीक्षक अतुल ब्रह्मभट्ट ,पोपटराव गावडे,पुर्वाताई वळसे पाटील,देवेंद्र शहा,बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील,जयसिंग एरंडे उपस्थित होते.
निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षात आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील राहिलेले पाणी प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील त्याचप्रमाणे प्रत्येक गावोगावी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाईल.
डिंभे धरणाचे भूमिपूजन 1978 साली झाले परंतु 2000 सालापर्यंत पाणी मिळाले नव्हते. 90 साली आमदार झाल्यानंतर अधीकचा निधी आणून डिंभे धरणाचे काम पूर्ण केले. त्याचप्रमाणे कुकडी प्रकल्पा अंतर्गत 65 बंधारे आंबेगाव शिरूर जुन्नर तालुक्यात उभे केले. अजूनही सातगाव पठार, आदिवासी भाग व शिरूर तालुक्यातील बारा गावांमध्ये पाणी पोहचवायचे आहे.ही गावे बागायती करायची आहेत. कुकडीची तिसरी मान्यता झाली तेव्हा 65 बंधारे एकदाच भरायचे नियोजन होते.परंतु आपण या निर्णयात बदल केला आणि 65 बंधारे या प्रकल्पांतर्गत आणले.डिंभे धरणाला बोगदा पाडून धरणातील पाणी पलीकडच्या बाजूला न्यायचे होते असे झाले असते तर तीन महिन्यात धरण रिकामे झाले असते. आणि पुन्हा एकदा आंबेगाव शिरूर तालुका हा दुष्काळी झाला असता. माळीनची दुर्घटना झाली त्यानंतर नवीन गाव वसवले तेथील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आसाणे या ठिकाणी तलाव बांधुन त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.थिटेवाडी बंदरातील गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. कळमोडी चे काम लवकर पूर्णत्वास येईल आणि त्या माध्यमातून शिरूर खेड आंबेगाव तालुक्यातील अनेक गावे बागायती होतील मोठ्या प्रमाणावर इमारती आपण तालुक्यात बांधल्या.आपला भीमाशंकर कारखाना उत्तम सुरू आहे .शेजारील कारखाना बंद पडला पण त्यावर कोणी बोलत नाही आपण 3200 रुपये बाजार भाव दिला.आपण अनेक सरकारी शाळा वसतिगृह इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केला त्याचप्रमाणे खाजगी शिक्षण संस्था सुरू केल्या त्यातून आपण शिक्षणाचे काम करत आहोत इंजिनिअरिंग महाविद्याल सुरु केले.
आरोग्य सेवेसाठी पहिले तीस बेडचे मंचर या ठिकाणी हॉस्पिटल सुरु केली त्यानंतर 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालय केले त्यासाठी देवेंद्र शहा अध्यक्ष असलेल्या पांजरपोळ ट्रस्टची जागा त्यांनी सरकारला दिली. तांबडेमळा या ठिकाणी 100 बेडच्या नवीन हॉस्पिटलचे काम सुरू आहे .त्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा आपण देत आहोत .
भीमाशंकर तिर्थक्षेत्रासाठी 148 कोटीचा आराखडा मंजूर आहे. परंतु तेथे वनविभाग व इतर कायदे अडचणीमुळे थोडी अडचण आहे .पण यावरही मार्ग काढून हा विकासाचा आराखडा पुर्ण करु.अनेक देवस्थानांना आपण चांगल्या प्रकारे निधी दिला आहे. मंचर येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधली घोडेगाव तहसील कार्यालय इमारत बांधली ,कोर्टाची इमारत बांधली. पंचायत समिती कार्यालयाची इमारत बांधली. मंचर व घोडेगाव या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती व पोलीस वसाहत बांधली .भोरवाडी या ठिकाणी एसटी डेपो सुरू केला नवीन बस स्थानक मंचर या ठिकाणी आपल्याला करावयाचे आहे. मंचर ग्रामपंचायत ची नगरपंचायत केली.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून निधी आणला मी अजित दादा पवार यांच्याकडून निधी आणला व मंचरचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले. तालुक्यात अष्टविनायक महामार्ग व बेल्हा जेजुरी महामार्ग उभे केले. तसेच नवीन अवसरी फाटा पारगाव ,टाकळी हाजी ,मलठण गणेगाव खालसा, शिक्रापूर असा नवीन रस्ता मंजूर आहे त्यासाठी 416 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
विजेच्या बाबतीत अनेक कामे केली पाण्यासाठी आपण 135 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सध्या सुरू आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात 63069 महिलांना व शिरूर तालुक्यातील 37390 महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय. बळीराजा योजनेतून 7.5 एचपी पर्यंत मोफत वीज देण्याचे काम आपण केल.असे वळसे पाटील म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणाव कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश स्वामी थोरात यांनी केले, सूत्रसंचालन निलेश पडवळ तर आभार अंकीत जाधव यांनी मानले