गावागावातुन
पोंदेवाडी येथे भागवत कथेची सांगता.
लोणी धामणी-राजु देवडे
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) या ठिकाणी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणामध्ये श्रीमद् भागवत कथेचा सांगता सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे ग्रामदैवत गडदादेवी मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त पोंदेवाडी येथे ह.भ.प. गणेश महाराज शिंदे उदापुर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात गले होते.ही भागवत कथा रोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळात गडदादेवी मंदिर सभागृह पोंदेवाडी या ठिकाणी संपन्न झाली. तर या कथेची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली.
सात दिवस चाललेल्या या भागवत कथेला मोठ्या प्रमाणावर स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहत होते.
रोज एक हजार ग्रामस्थ या कथासोहळ्याला उपस्थित राहत होते.सायंकाळी सहा ते नऊ कथा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वांसाठी अन्न प्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या कथेसाठी उपस्थित दोन महिला व दोन पुरुषांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीसे देण्यात येत होती.या कथा सप्ताहाच्या कार्यक्रमाला अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम ,उद्योजक रमेश येवले, त्याचप्रमाणे विविद्य मान्यवरांनी या उत्सवाच्या निमित्त आयोजित केलेल्या या कथा सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
हा कथा सप्ताह यशस्वी करण्यासाठी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,सुशांत रोडे,उपसरपंच महेंद्र पोखरकर,माजी उपसरपंच संदीप पोखरकर,माजी सरपंच सदाशिव रोडे,जयसिंग पोंद,अमोल वाळुंज,पांडुरंग ढमाले,सोमनाथ वाळुंज,आनंदा पोंदे,नानाभाऊ पोखरकर,भाऊसाहेब पोंदे यांसह ग्रामस्थांनी व्यवस्था पाहिली.