गावागावातुन

जारकरवाडीत पारंपारिक पद्धतीने दसरा साजरा

Published

on

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे


जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापना पासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, श्रींची महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात किरण ताई वळसे पाटील, देवदत्त निकम, पारगाव सरपंच श्वेता ढोबळे, उद्योजक रमेश लबडे, कृषी आयुक्त प्रशांत गवळी, कारखाना संचालक रामचंद्र ढोबळे, सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच कौशल्या भोजने, सचिन टाव्हरे , माजी सरपंच रूपाली भोजने कचरदास भोजने, उत्तम मंचरे, चेअरमन सुर्यकांत लबडे, सागर पाटील आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

रात्री आठ नंतर निलेश पडवळ यांचा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सोसायटी सचिव नवनाथ मंचरे, माजी उपसरपंच रवींद्र भांडं, सैनिक योगेश भांड, अविनाश तागड, मंगेश भोसले, अविनाश पवार, योगेश काकडे, बाळु वणवे यांनी पाहिली तर सूत्रसंचालन निवृत्ती भांड, नवनाथ जारकड, पोपट भोजने , गोरक्ष भोजणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version