गावागावातुन
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा.ना. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले असुन. त्यानुसार सोमवार दि. ७ ऑक्टोबर ते बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहील. त्यामध्ये (१) पुर्ण भागधारक (रु. १०,०००/-) व ऊस उत्पादक – ८० किलो (२) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक – ६० किलो (३) अपुर्ण भागधारक व ऊस नाही – ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.
- सोमवार दि. ७ – पारगाव गटातील गावे,
- मंगळवार दि. ८ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील गावे,
- बुधवार दि. ९ – निरगुडसर व पिंपरखेड गाव, कळंब व रांजणी गटातील गावे,
- गुरुवार दि. १० – मंचर गटातील गावे,
- शुक्रवार दि. ११ – मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावे,
- रविवार दि. १३ – टाकळी हाजी व कवठे गटातील गावे,
- सोमवार दि. १४ – टाकळी हाजी व कवठे गाव, करंदी, जातेगाव गटातील गावे,
- मंगळवार दि. १५ – करंदी व जातेगाव गाव, भोरवाडी, निमगाव सावा,
नारायणगाव, ओझर गटातील गावे, - बुधवार दि. १६ – भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव गटातील गावे,
जे सभासद / ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर ते बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीमध्ये कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून काही गावांमध्ये सलग २ दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.