गावागावातुन
जवळे येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची जयंती संपन्न
निरगुडसर प्रतिनिधी – प्रमोद दांगट
जवळे तालुका आंबेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात २ ऑक्टोबर राष्ट्रपीता महात्मा गांधी जयंती व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त ग्रामपंचायत जवळे यांनी ग्रामपंचायत समोरील परिसरची स्वच्छता केली. त्याचप्रमाणे स्वच्छ माझे अंगण महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रम राबविण्यात आला या मध्ये शासनाने दिलेल्या स्वच्छते विषयीच्या नियम अटींमध्ये बसणाऱ्या महिला भगिनींचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला.
यात ७ महिलांची निवड करण्यात आली यामध्ये वैशाली वायकर, सुशीला गभाले, सुशीला लोखंडे ,जयश्री शिंदे, छाया लायगुडे, मंदा टाव्हरे, इंदुबाई पवार यांचा आदर्श सरपंच सौ वृषाली शिंदे पाटील यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ ,सन्मानपत्र व डसबिन देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपसरपंच मनीषा टाव्हरे, दत्तात्रय लायगुडे, भीमाशंकर संचालक बाबासाहेब खालकर, विकास सोसायटीचे चेअरमन रमेश भुजबळ, जालिंदर लायगुडे ,पोपट लायगुडे सुरेश गावडे, नारायण खिलारी, रामा बोराटे, अशोक लोखंडे, उत्तम बोराटे, रामा पवार पंढरी टाव्हरे अशोक ताजणे या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती ग्रामसेविका शिला साबळे यांनी दिली.