गावागावातुन

आंबेगावात तालुक्याच्या पुर्व भागात बैलपोळा उत्साहात साजरा.

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे


आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, पारगाव, लोणी ,धामणी, पोंदेवाडी आदी गावांमध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे बैल पोळा. हा सण सर्जा-राजाला समर्पित असून, या सणानिमित्त गावागावांत सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.


पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलांच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे. या सणानिमित्त गावात सलोखा आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. कृषी कार्यात हजारो वर्षांपासून जनावरांचा उपयोग फार महत्त्वाच्या ठरलेला आहे. त्यात शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्त्वाचा राहिलेला आहे. शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राच्या वापर वाढला असला तरी छोट्या शेतकऱ्यांना प्रत्येक बाबतीत यंत्राच्या साह्याने शेती करणे महागात पडत असते. म्हणून आजही गावागावांत पाच एकरपर्यंत शेती असलेले छोटे शेतकरी आपल्या घरी वर्षभर किमान एक बैलजोडी ठेवून त्यांच्या भरवशावर शेती करतात. अशात शेतकऱ्यांसाठी त्याच्या सर्वात जास्त विश्वासू सवंगडी म्हणजे त्याच्या घरी असलेले बैल. वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतेही कामे केली जात नसून त्यांना अंघोळ करून वेगवेगळ्या पद्धतीने सजवून पुरणपोळी खाऊ घालून पूजा केली जाते.


या दिवशी शेतकरी पहाटे उठून आपल्या बैलांना नदीवर किवा तलावात नेऊन चांगल्या पद्धतीने धुऊन घरी आणतो. या दिवशी बैलांना खांद्यावर किंवा जखमा असलेल्या ठिकाणी हळद आणि तुपाचा लेप लावला जातो. शेतकरी आपल्या जीवलग मित्र असलेल्या बैलांना आपल्या ऐपती- प्रमाणे सजवण्याच्यासाठी बाजारातून वेगवेगळे श्रृंगार साहित्याची खरेदी करून आणतो. बैलांना मारुतीच्या देवळासमोर नेऊन नमन करतो व घरी आणतो. शेतकऱ्याची कारभारीण वर्षभर त्या बैलांकडून आपल्या शेतीची कामे करीत असताना वर्षातून एकदा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला येणाऱ्या पोळ्याच्या सणाला एक दिवस बैलांसाठी समर्पित केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version