गावागावातुन
पोंदेवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत गडदादेवी मातेच्या नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून.ह.भ.प. भागवताचार्य गणेश महाराज शिंदे उदापूर यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली.
पोंदेवाडी गावचे ग्रामदैवत गडदादेवी मातेच्या मंदिरामध्ये दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नवरात्र उत्सव मध्ये केले जाते. याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या नवरात्र उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 3/10/ 2024 पासून तर दिनांक 12/ 10/ 2024 या कालखंडामध्ये विविध कार्यक्रम होनार आहे. दिनांक 4 पासुन दिनांक 11 पर्यंत रोज सायंकाळी सहा ते नऊ भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थ पाहुण्यांसाठी अण्णप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत कथेसाठी उपस्थित असणाऱ्या महिलांचा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून रोज दोन भाग्यवान महिलांना खरेदीविक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्याकडून पैठणी. तसेच दोन भाग्यवान पुरुषांसाठी उभा पोषण संदीप पोखरकर माझी उपसरपंच यांच्याकडून देण्यात येणार आहे.
3 तारखेला घटस्थापने कार्यक्रमाची सुरुवात होऊन या कार्यक्रमाची सुरुवात होनार असून रात्री घरबा होनार आहे.त्याचप्रमाणे रोज सकाळी 9:00 वाजता व सायंकाळी 9:00 वाजता देवीच्या मंदिरामध्ये आरतीचे आयोजन करण्याचा आले आहे. दिनांक 11/10/ 2024 रोजी काल्याचे किर्तनाने भागवत कथेची सांगता होणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचा नवरात्र उत्सव म्हणून या नवरात्र उत्सवाकडे पाहिले जाते. या नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पोंदेवाडी चे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी दिली