गावागावातुन

गणेशनगर मेंगडेवाडी येथील नवसाला पावणारा स्वयंभू श्री गणेश

Published

on

शब्दांकन -पत्रकार श्री.ह.भ.प. मधुकर महाराज गायकवाड गावडेवाडी

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या मंचर शिरूर मार्गावर मंचर पासून पूर्वेला असलेल्या बारा किलोमीटरच्या अंतरावर साधारणपणे दोन हजार लोकवस्तीचे अतिशय सुंदर व छोटेसे खेडे मेंगडेवाडी . ( गणेशनगर )
. या गावात असलेल्या गणपतीच्या मंदिरातील स्वयंभू श्री गणेश मूर्तीमुळे मेंगडेवाडी गणेशनगर हे छोटेसे गाव आंबेगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे या गावात श्री गणेश चतुर्थी व श्री गणेश जयंतीला भव्य गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीला प्रवचन भजन पालखी सोहळा व मिरवणुकीचे आयोजन केले जाते या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून अनेक गणेश भक्त गणेशनगर, मेंगडेवाडी येथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात . तसेच नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असलेले मेंगडेवाडी गावातील नागरिक तरुण गणेशोत्सवाला दरवर्षी गावी येऊन श्री गणेशाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतात.

‘ प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गावात घरोघरी श्री गणेशाची पूजा करून उपवास धरला जातो . तसेच या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फराळ देखील वाटप केला जातो दरवर्षी होणाऱ्या गणेश देवाच्या कार्यक्रमात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांच्याकडून प्रबोधन केले जाते .तसेच आठ दिवस पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते अंगारकी चतुर्थीला कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले जाते ही सर्व व्यवस्था समस्त ग्रामस्थ गणेशनगर मेंगडेवाडी व श्री गणेश देवस्थानच्या माध्यमातून केली जाते


नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती
या स्वयंभू गणपती पुढे मनातील मनोकामना सांगितल्यास हा गणपती ती मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी असते . गणेशोत्सवाच्या काळात येथील एकाही घरी गणपतीची प्रतिष्ठापना केलीजात नाही त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना या गावातून पुढे उदयास आली.


आख्यायिका

मेंगडेवाडी येथीलजुने जाणते वयोवृद्ध भक्त सांगतात की हे मंदिर प्रथम कोणी व केव्हा बांधलेले आहे हे सांगता येणे कठीण आहे मात्र जुन्या पिढीतील लोकांच्या म्हणण्यानुसार तुळजापूर येथील कदमांची पाटी असलेले काही कदम मंडळी उपजविका करण्यासाठी निरगुडसर या गावी आले ते निरगुडसर येथे वास्तव्य करीत होते त्यावेळी गावचा बराचसा परिसर उजाड माळरान होता गावच्या उत्तरेस घोड नदी तर दक्षिणेस गण्या डोंगर अशी निसर्गरम्य डोंगराची उंच माळराने होती या डोंगराच्या आजूबाजूच्या परिसरात शेती जिरायत असल्यामुळे माळरानावर जनावरे शेळ्या जाण्यासाठी कदम मंडळी जात होती या छोट्याशा डोंगरावर एक गणेशाचे छोटे खानी कवलारूमंदिर होते त्या मंदिरात एक शेंदूर लावलेला दगड होता लोक त्याला मनोभावेगणपती म्हणून पुजत होते . कदम हे मेंढ्यांचा व्यवसाय करत. मेंढपाळ असून मेंढ्यांचा व्यवसाय करीत आहेत पुढे मेंडक्यांची वाडी म्हणजेच मेंगडेवाडी असाशब्दप्रयोग रूढ झाला. कदम यांनी आपले आडनाव बदलून मेंगडे हे आडनाव धारण केले . काही काळानंतर डोंगरावर जाता येईना तेव्हा त्यांच्या पूजा अर्चेत खंड पडू लागला तेव्हा गणेशाने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की तुम्ही जवळच्या अंतरावर जाऊन तेथे जमीन खोदा म्हणजे मी सापडेल जमीन खोदली असता तेथे स्वयंभू गणेशाची मूर्ती मिळाली . तिची प्रतिष्ठापना केली हेच ते गणेशनगर मेंगडेवाडी . आजूबाजूच्या परिसरातून तरुण आबाल वृद्ध या गणेशाचे दर्शन घेण्यास येतात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून या ठिकाणी अतिशय भव्य असा मंडप उभारलेला आहे या मंडपात तीन ते चार हजार लोक एका वेळेला बसू शकतात या भागात येण्यासाठी रस्ते अतिशय चांगले आहेत दळवणाच्या सोयी अतिशय चांगल्या आहेत तरीही पूर्व भागात असल्याने हे स्थान दुर्लक्षित आहे एसटी महामंडळाच्या एसटी बस नसल्याने या ठिकाणी सामान्य भाविकांना येताना त्रास होतो .मात्र लोकप्रतिनिधींचे बारकाईने लक्ष या तीर्थक्षेत्रावर आहे लोकप्रतिनिधींच्या भरीव विकास निधीमुळे या भागाचा कायापालट झालेला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version