गावागावातुन
काठापुर बुद्रुक येथे ऊस जळाला शेतकऱ्याचे मोठे नुकसान
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
काठापुर बुद्रुक ता. आंबेगाव या ठिकाणी विजेच्या तारांमधे शॉर्ट सर्किट झाल्याने सुभाष संपत जाधव या शेतकऱ्याचा 36 गुंठे ऊस जळाला असून. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.सध्या साखर कारखाने सुरू न झाल्याने या शेतकऱ्याचा ऊस तोडला जाणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने यावर योग्य ती दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी जाधव यांनी केली आहे.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी पांडुरंग वस्ती येथे गट नंबर 419 यामध्ये शेतकरी सुभाष संपत जाधव यांनी एक वर्षापूर्वी आडसाली उसाची लागवड केली होती या उसाच्या शेताच्या वरून विजेच्या तारा जात होत्या या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे .काठापूर बुद्रुक या ठिकाणी एमएस ईबी बोर्ड असल्याने त्याचप्रमाणे गावातील विद्युत मोटारी आहेत यांना विज पुरवठा केला जातो. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात विजेचे खांब विजेच्या तारा पसरलेल्या आहेत.अनेकवेळा गावातील शेतकऱ्यांचा ऊस यामुळे जळत असतो. शेतकरी सुभाष संपत जाधव यांचा ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने दखल घेऊन या उसाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.