गावागावातुन
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला 3200 रुपये टनाला बाजारभाव दिल्याने, काठापुर बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला 3200 रुपये टनाला बाजारभाव दिल्याने काठापुर बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करून लाडू वाटप करण्यात आले.
काठापुर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील ग्रामस्थ शेतकरी बांधवांनी ऊस पिकाला भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने प्रती टन 3200 बाजारभाव दिला त्यामुळे गावच्या वतीने कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील ,संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, बाजीराव बारवे दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे ,माऊली आस्वारे,पुष्पलता जाधव, मच्छिंद्र गावडे, नितीन वाव्हळ, पोपट थिटे यांचा फेटे बांधून सत्कार केला. त्याचप्रमाणे गावामध्ये लाडू वाटून मिळालेल्या बाजार भावाचे स्वागत केले. यावेळी सरपंच अशोक करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पु खुडे,अनिल जाधव,अशोक जोरी,विनायक करंडे,कान्हु करंडे,रोहिदास तुळे,सोसायटीचे चेअरमन कुंडलीक जोरी, संचालक रवींद्र करंडे, पंढरीनगथ करंडे,ग्रामपंचायत सदस्या अर्चना जाधव, नवनाथ जाधव, अक्षय करंडे,नरहरी करंडे,राहुल भुरके,किशोर करंडे,रंगनाथ करंडे,यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.