राजकीय
लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिनींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.माघील वर्षभरात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.
मंचर प्रतिनिधी
मागील वर्षभराच्या कालखंडामध्ये या सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला आणि हीच भूमिका या सरकारची आहे. लाडकी बहिण योजनेचा आनंद बहिणींच्या चेहऱ्यावर दिसत आहे.असे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
मंचर (ता.आंबेगाव) येथे आयोजित जनसंकल्प अभियान यात्रे प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा ,उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भिमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, विष्णुकाका हींगे,अंकीत जाधव,यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले की दुधाला पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे. चक्रीवादळ अतिवृष्टी च्या वेळी सरकारच्या वतीने मदत केली जात आहे .खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील हिरडा विकासासाठी 15 कोटी रुपये दिले आहेत. मागील 35 वर्षे मला विधिमंडळात पाठवले त्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा या पुणे मुंबईच्या रुग्णालयाच्या तोडीची आहे. नवीन 100 बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. शिक्षणासाठी हायस्कूल, वस्तीगृह, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग ,आश्रम शाळा सुरू केल्या.अवसरीच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग च्या माध्यमातून अनेक तरुण इंजिनियर तालुक्यात निर्माण झाले. पुढच्या पाच वर्षात एकच काम करायचे आहे आंबेगाव जुन्नर शिरूर मध्ये 65 केटी बंधारे आहेत हे तीन वेळा भरले जातात. आणि त्यातून शेतकरी समृद्ध झाला आहे. यासाठी पाणी आरक्षित करायचे आहे .कळमजाई ,बोरघर, फुलवडे साठी लिफ्ट पाणी योजना .लोणी धामणीसाठी म्हाळसाकांत.शिरुरच्या पाबळ केंदुर परिसरातील 12 गावांसाठी पाणी योजना ,सातगाव पठार साठी कळमोडी या योजना पूर्ण करायच्या आहेत.
विधानसभा ताकतीने लढवायची व जिंकायची आहे .काही लोक बदनामी करतात खोटे बोलतात त्याला मी उत्तर देऊ इच्छित नाही. माझी मुलगी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही म्हणून मलाच उभे राहावे लागेल असे यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले.