गावागावातुन

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला ; श्रीराम प्रतिष्ठान व निरगुडसर गावाने काढली जंगी मिरवणूक

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे

निरगुडसर ता. आंबेगाव येथील बबनराव नामदेव दांगट, संगीता/ अनुराधा बबन दांगट यांचा मुलगा प्रशांत बबन दांगट यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याने मिळवलेल्या यशाबाबत त्याचे गावात सर्वत्र कौतुक होत असून. दिनांक १५ ऑगस्ट रोजी त्याचा मित्रपरिवार, श्रीराम प्रतिष्ठान निरगुडसर व गावकऱ्यांनी एकत्र येत त्याची गावातून जंगी मिरवणूक काढली.

प्रशांत दांगट हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आई वडील भाजीपाल्याचा व्यवसाय करुण कुटुंब चालवतात तर प्रशांत हा पुणे येथे शिक्षण घेत असताना त्याला स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण झाली. कुटुंबाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता त्याने पुण्यात मिळेल ते काम करत शिक्षणाचा खर्च भागवला व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तब्बल चार ते पाच वर्षे अभ्यास करून तो पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाला व राज्यात सहावा क्रमांक पटकावला. कुठलाही क्लास न लावता त्याने मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याने निरगुडसर ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती निरगुडसर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालय, श्री गणेश देवस्थान मेंगडेवाडी, पारगाव पोलीस ठाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडसर यासह विविध ठिकाणी प्रशांत दांगट यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

त्यानंतर प्रशांत दांगट सदस्य असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान व गावकऱ्यांनी दिनांक १५ ऑगस्ट रोजी जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे नियोजन श्रीराम प्रतिष्ठान निरगुडसर यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गावातील एसटी स्टँड, विविध मुख्य चौकात जेसीपी द्वारे गुलाल भंडार याची उधळण करत प्रशांत दांगट याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी निरगुडसर, मेंगडेवाडी गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक पार पडल्यानंतर श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रशांत दांगट याचा सत्कार व सन्मान करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी गावातून जे युवक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना काही मार्गदर्शन लागल्यास ते मी नक्कीच देईल असे आश्वासन प्रशांत दांगट यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version