राजकीय
माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे दोन ते अडिच कोटी महिलांना होनार लाभ.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मंचर प्रतिनिधी
माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. येथील लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा विश्वास आहे.दोन ते अडीच कोटी महिला भगिनींना या योजनेचा फायदा होणार आहे.ही योजना महिलांना सबल आणि सक्षम करण्यासाठी सुरू राहील. आंबेगाव शिरुरला दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व मिळाले आहे.ते विधिमंडळात अतिशय यशस्वी जबाबदारी पार पाडतात असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले.
मंचर (तालुका आंबेगाव ) या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसंकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित दादा पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, सुरेश घुले, मानसिंग पाचुंदकर, लतीफभाई तांबोळी, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा,भिमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,जिल्हा परिषदेचे माझी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील,पुर्वा वळसे पाटील,विष्णुकाका हिंगे,अंकीत जाधव,निलेश थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित दादा पवार म्हणाले की 34 वर्षात दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगावचा कायापालट झाला आहे.त्यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध संस्था उभ्या राहिल्या आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये उर्वरित प्रश्न सोडवले जातील.कळमोडीचे, म्हाळसाकांत ,शिरूर तालुक्यातील बारा गावांसाठी पाणी योजना होईल. आदिवासी भागातील गावांसाठी ही पाणी योजना करण्यात येईल .डिंभे चा बोगदा जुन्नर आंबेगावच्या हिताचे जे असेल त्यानुसार केला जाईल. सध्या आम्ही फक्त विकासाच बोलायचं ठरवलं आहे.विरोधक काही म्हणतात परंतु काही म्हणून प्रश्न सुटत नाही. एखादा कार्यकर्ता सर्व गुणसंपन्न होण्यासाठी 25 ते 30 वर्षे काम करावे लागते. आम्ही ते केलं शिव, शाहू, फुले विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही चाललो आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या परंतु तसं नाही संविधान बदलल जानार नाही. मोदी साहेब संविधानाचा आदर करतात .चुकीची माहिती पसरवून गैरसमज निर्माण केला जातो. मी शब्दाचा पक्का आहे .जे झालं ते झालं इथून पुढे आपण सर्वांनी आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभ राहिले पाहिजे हि विनंती करतो.महिलांचे खूप मोठे प्रेम आम्हा सर्वांना मिळत आहे. महिला बालकल्यान मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी पैशाची मागणी केल्यानंतर सक्षग हजार कोटीच्या फाईलवर सही करून ते पैसे वर्ग केले. एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यावर पैसे गेले आहेत .रक्षाबंधन आधी दीड कोटी महिलांच्या खात्यावर सन्मान निधी हस्तांतरीत होईल.शेतकऱ्यांनसाठी साडेसात एचपी मोटर पर्यंत लाईट बिल माफ केले आहे व ते इथून पुढे माफ केले जाईल. पुढच्या सात ते आठ महिन्यात दिवसा विज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .माघेल त्याला सोलर पंप दिला जाईल. आंबेगाव शिरुर चे नेतृत्व सक्षम आहे. राज्यातील सर्वाधिक लीड एक नंबरच लीड या निवडणुकीत आपण वळसे पाटलांना दिले पाहिजे असे यावेळी अजित दादा पवार म्हणाले.