गावागावातुन
घोड नदीवरील लाखनगाव येथील पुल पाण्याखाली बेल्हा जेजुरी महामार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवीली
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.धरण क्षेत्र व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज ( दि. ४ ) दुपारच्या सुमारास घोड नदीवरील अनेक बंधारे, पुल पाण्याखाली गेले. आहे त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नदीलगत असणाऱ्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
प्रशासनाकडुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लाखणगाव ( ता. आंबेगाव ) येथील घोडनदीवर असनारा बेल्हा जेजुरी महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ईतर मार्गावरुन वळविण्यात आली आहे .लाखनगाव येथील घोड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने सदर पूल पाण्याखाली गेला असून नागरिकांनी धोका पत्करून या पुलावरून प्रवास करू नये असे आव्हान ख. वि.संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी सरपंच मार्तंड टाव्हरे, पोलीस पाटील कल्पना बोराडे, कुंडलिक पोखरकर यांनी नागरिकांना केले आहे
तालुक्यातील चांडोली पारगाव व इतर गावातील पुलावरून पाणी वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. अचानक वाढलेल्या नदी प्रवाहातील पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप पाण्याखाली गेले तसेच अनेक पंपाचे पाईप देखील पाण्याबरोबर वाहून गेल्याचे दिसत होते.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांनी पाणी बघण्यासाठी नदीवर जाऊ नये. सेल्फीचा मोह टाळावा, ज्यादा पाण्यात शिरू नये. तरुणांनी फोटोसेशन साठी उल्लडबाजी करू नये. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.