गावागावातुन
वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून शालेय विद्यार्थ्यांना मदत.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
अलीकडच्या काळात वाढदिवस
साजरा करत असताना विविध उपक्रम राबवले जातात. वाढदिवसाच्या निमित्ताने मोठा खर्चही केला जातो. परंतु, शिरदाळे ता. (आंबेगाव ) येथील मा.युवा उपसरपंच मयूर सरडे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पहाडदरा येथील ठाकूरवाडी येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप केले आहे.
वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी शाळेतील विद्यार्थ्यानां त्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल.या उद्देशाने साहित्य वाटप केल्याचे मयूर सरडे यांनी सांगितले.
यावेळी पहाडदरा गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, उद्योजक गणेश तांबे, दिपक जाधव, जयदीप चौधरी, कैलास वीर, अक्षय रोडे, चेतन रोडे, प्रतीक गोरडे, शांताराम रोडे, आनंदा जाधव, बाळासाहेब बोराडे, पूजा सरडे, मुख्याध्यापक इंदोरी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.