गावागावातुन
काठापुर बुद्रुक शाळेस शांतारामदादा घुले यांच्या वाढदिवसानिमित्त सात व्हाईट बोर्ड भेट.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या शाळेस इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गासाठी सात व्हाईट बोर्ड शांतारामदादा घुले यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भेट देण्यात आले.
काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक ते सातवी पर्यंतचे वर्ग असून.येथे 110 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला अत्याधुनिक व्हाईट बोर्ड भेट म्हणून देण्यात आले.शांतारामदादा घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे बोर्ड देण्यात आले. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, सरपंच अशोक करंडे ,माझी उपसरपंच विशाल करंडे,पप्पू खुडे, कान्हु करंडे, रोहिदास तुळे, सोसायटीचे चेअरमन कुंडलीक जोरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल भुरके ,उपाध्यक्ष काळुराम टिंगरे, प्रशांत घुले,ग्रामपंचायत उपसरपंच दादाभाऊ गायकवाड, पुनम करंडे, अर्चना जाधव, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक नंदकुमार चासकर ,दिनेश तोळे, उत्तम वाव्हळ, सुरेश भागवत उपस्थित होते.यावेळी प्रत्येक वर्गासाठी एक असे सात बोर्ड को देण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वह्या ,पेन, खोडरबर व खाऊचे वाटप करण्यात आले. शांतारामदादा घुले यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी विद्यार्थी व शाळेसाठी विविध स्वरूपाचे उपक्रम राबवले जातात. यावर्षी व्हाईट बोर्ड दिल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षन घेता येणार आहे.असे सरपंच अशोक करंडे म्हणाले.