गावागावातुन
आंबेगावात पावसाची संततधार, घोडनदी दुथडी भरून वाहू लागली.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरुवार (ता. २५) पर्यंत डिंभे धरण ४९. ९०% भरले आहे. या पावसामुळे सकल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने तलावांचे स्वरूप प्राप्त झाले होते. आदिवासी भागात सतत पडणाऱ्या पावसाने घोडनदी दुथडी भरून वाहू लागली आहे आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पावसाने जूनमध्ये ओढ दिल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. त्यातच गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून धरण क्षेत्रातदेखील संततधार सुरू असल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसर या सतत पडणारे पावसामुळे शेती पिके तरली असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे.