गावागावातुन
लोणीत ग्रामसुरक्षा दलाचा रात्रीचा पहारा.
निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे
आंबेगावच्या तालुक्याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी,वडगावपीर,लोणी,धामणी या गावातील व परिसरातील गावात चोरांचा सूळसूळाट झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पररले आहे. धामणी-जारकरवाडी येथील आठ दिवसापूर्वी काद्यांची वरखारीतून काद्यांची चोरी झाली होती.हे कांदा चोर पारगाव कारखाना पोलीस स्टेशने दोन दिवसापूर्वी पकडले.मात्र इतर ठिकाणी झालेल्या चोर्यांच्या बाबत मात्र अजून चोरांचा शोध सुरू असल्याचे समजते. चोरांन बरोबरच रात्रीचे ड्रोन फिरत असल्याने नागरीकांना रात्र जागून काढावी लागते.या सदर्भात लोणी येथील सर्व ग्राम सुरक्षा दलाच्या यूवकांनी आपल्या गावचे रक्षण करण्यासाठी रात्रीची ग्रस्त सुरू केली आहे.या संदर्भात ग्रामसुरक्षा दलाच्या वतीने सतिश थोरात यांनी सांगितले की, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनवर मोठा कामाचा तान असून त्यांना मदत म्हणून लोणी येथील सर्व ग्रामसुरक्षा दलाच्या यूवकांनी रात्री ग्रस्त घालण्याचे ठरविले व आम्ही लोणीतील व परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ग्रस्त चालू केली आहे. पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखालीच येथील ग्राम सुरक्षा दलाने रात्रीची ग्रस्त सुरू केली असल्याचे पोलीस पाटील संदिप आढाव यांनी सांगितले.निधान या ग्रस्तीमुळे बूरट्या चोरांना आळा बसेल असेही आढाव यांनी सांगितले.