गावागावातुन
निरगुडसर विद्यालयात वृक्षारोपन व सायकल वाटप.
निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे
प्रत्येक विद्यार्थ्याने जिवनात आत्मविश्वासाने,जिद्दीने मनलावून अभ्यास केला तर जीवनातील संघर्षात कोणतीही परीक्षा असो त्या परिक्षेत विद्यार्थी यशसवी होणारच असे प्रतिपादन उप महाप्रबंधक एवं क्षेत्रीय प्रमुख पुणे जिल्हा क्षेत्र, बॅक ऑफ बडोदा शब्बीर मेहसानीया यांनी केले.
निरगुडसर ( ता.आंबेगाव) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात बॅक ऑफ बडोद्याच्या ११७ व्या वर्धापन दिना निमित्त गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून येथील गरजु विद्यार्थ्यांना दहा सायकलचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बॅक ऑफ बडोदा अवसरी खुर्द शाखेचे शाखा प्रबंधक सचिन नाईकवाडे,खेडचे शाखा प्रबंधक दयानंद प्रसाद,क्षत्रिय कार्यालय पुणे वरिष्ठ प्रबंधक कांतीलाल बाविस्कर,वरिष्ठ प्रबंधक मंगेश कुंभार तसेच संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर,संचालक श्रीकांत पवार,माजी प्राचार्या सुनंदा गोरे उपस्थितीत होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.या वेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी केले,सूत्रसंचालन मोहन दरेकर व आभार पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी केले.