गावागावातुन
अवसरी खुर्द येथे लग्नाच्या कार्यक्रमात वराती ऐवजी कीर्तन
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
समाजामध्ये व विशेषता तरुण तरुणींमध्ये डीजेची वाढती मागणी व डिजेच्या तालावर बेधुद होऊन नाचणारी तरुण पिढी आपण पाहतो मात्र या सर्व अधोगतीकडे नेणाऱ्या गोष्टींना फाटा देऊन अवसरी खुर्द (ता.आंबेगाव )येथील राजगुरू कुटुंबाने तरुणाईची मागणी धुडकावून लग्नाच्या वरातीमध्ये वारकरी सांप्रदायिक कीर्तन ठेवून समाजापुढे एक वेगळा आगळा आदर्श निर्माण केल्याने राजगुरू कुटुंबीयांची पंचक्रोशीत कौतुक होत आहे
अवसरी खुर्द येथील सोमनाथ मोराजी राजगुरू यांचा मुलगा शंभू व चिंचोली गुरव ता संगमनेर येथील नानासाहेब तुपसुंदर यांची कन्या राधा यांचा शुभविवाह नांदूर शिंगोटे सिन्नर येथे रविवारी (ता. २१ ) संपन्न झाला बहुतेकांनी रात्री वरात जोरात करू असे नियोजन केले होते मात्र राजगुरू कुटुंबीयांनी वराती ऐवजी वारकरी सांप्रदायिक कीर्तन ठेवण्याचा निर्णय घेतला व आदर्श ग्राम गावडेवाडी येथील युवा कीर्तनकार हभप मधुकर महाराज गायकवाड यांचे सुश्राव्य कीर्तन ठेवले मंचर अवसरी खुर्द ईश्वरबुवा परिसरात झालेल्या या कीर्तनाला श्रोत्यांनी व तरुण-तरुणींनी बहुसंख्येने गर्दी केली होती या कीर्तनाला अर्जुन बुवा पंचरास (लोणी) लक्ष्मण बुवा लोंढे (कोरेगाव )संतोष, दीपक, मंगेश, संभा शिंदे खरपुडीकर व भाविकांनी सुंदर साथ केली राजगुरू कुटुंबियांचे या उपक्रमामुळे परिसरात कौतुक होत आहे