गावागावातुन

ड्रोनमुळे कोणीही भयभीत होऊ नये: स.पो.नि.गंधारे

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी:राजु देवडे

सध्या आंबेगाव तालुक्यात ड्रोनच्या रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या घिरट्या आणि चोरीचे प्रमाण लक्षात घेता पारगाव पोलीस स्टेशनचे स.पो.नि. नेताजी गंधारे यांनी लोणी धामणी येथील युवकांशी आणि ग्रामसुरक्षा दलातील तरुणांशी संवाद साधला. आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या वाढल्याचे अनेक नागरिकांनी वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली होती सहकार मंत्री वळसे पाटील यांनी ड्रोन संदर्भात
जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे त्यामुळे ड्रोनच्या भीतीने कोणीही भयभीत होऊ नये. तसेच कोणाला काही संशयित गोष्टी आढळल्या तर त्यांनी पारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अथवा गावातील पोलीस पाटील,ग्रामसुरक्षा यंत्रणा यांच्याशी संपर्क करावा. चोरीच्या घटना या रात्री 12 ते 3 या वेळेत घडत असून नागरिकांनी देखील सतर्क राहावे असे गंधारे यांनी सांगितले. प्रत्येक गावातील ग्रामसुरक्षा दलातील तरुण सहकारी चांगले सहकार्य करत असून रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना कोणीही कायदा हातात घेऊन कुठले काम करू नये असे आवाहन यावेळी गंधारे यांनी केले.

धामणी,शिरदाळे,पहाडदरा ग्रामस्थांच्या वतीने यावेळी स.पो.नि.नेताजी गंधारे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मयुर सरडे, धामणी उपसरपंच अक्षय विधाटे, मा.सरपंच सागर जाधव, धामणी पोलीस पाटील .सुरज जाधव,भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंत जाधव,धामणी उपसरपंच अक्षय विधाटे,मा.सरपंच सागर जाधव,भाऊसाहेब करंडे ग्रामसुरक्षा दलाचे व नागरिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version