शैक्षणिक
आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडी मध्ये मातृ पूजनाने गुरुपौर्णिमा साजरी.
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
जारकरवाडी (ता.आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालय मध्ये मातृ पूजनाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते त्यांच्या मातांचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित माता पालक राधा मोरे,स्वाती ढोबळे, मालन ढोबळे,सीमा लबडे,मंगल शिंदे या माता पालकांचे त्यांच्या पाल्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.तद्नंतर झालेल्या छोट्या सभेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरूंबद्दल आदर व्यक्त करून गुरूंचे महत्त्व सांगितले.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक सांगून त्यांचे अर्थही सांगितले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयातील सर्व शिक्षकांनी केल होते.अशी माहिती मुख्याध्यापिका शाशिकला वाघमारे यांनी सांगितली. कार्यक्रमाची सांगता उपस्थित पालकांचे आभार मानून पसायदानाने झाली.