गावागावातुन
आंबेगाव भा.ज.पा. विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी हर्षल सुतार
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
लोणी ( ता. आंबेगाव) येथील हर्षल बाळासाहेब सुतार यांची नुकतीच आंबेगाव तालुका भा.ज.पा. विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे सदर निवडीचे पत्र आंबेगाव तालुका भाजपा अध्यक्ष संदीप बाणखेले यांनी दिले आहे. यावेळी भा.ज.पा. कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष किरण वाळुंज, भा.ज.पा. दिव्यांग आघाडी अध्यक्ष प्रकाश सिनलकर आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षल सुतार हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत हर्ष संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवले आहेत यापुढील काळात मिळालेल्या पदाचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी करणार असल्याचे हर्षल सुतार यांनी सांगितले.