गावागावातुन
पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे
पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ मिळाली असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आंबेगाव
तालुका कृषि अधिकारी आंबेगाव नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.
खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आंबेगाव तालुक्यातील शुक्रवार ( दि.१९ ) अखेर 23 हजार 771 शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज रक्कम एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी सांगितले.
मागील वर्षी तालुक्यातील 19 हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला असून, सुमारे 4 कोटी 47 लाख रुपये विमा भरपाई मिळाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, ३१ जुलैपर्यंत तालुक्यात सुमारे 30 हजार शेतकरी नोंदणी करून योजनेत सहभागी होतील, असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन पीकविमा काढून सुरक्षा कवच मिळवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.
खरिपातील पिकासाठी ही विमा योजना असून, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. आपले सरकार सेवा केंद्र सीएससी धारकांस विमा कंपनीमार्फत
प्रति अर्ज ४० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बिगर कर्जदार शेतकरी आपल्या पिकांचा विमा जवळच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी आदी वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात. प्रादेशिक ग्रामीण बँका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी)/https:// pmfby.gov.in/farmerLogin वेबसाइट लिंकद्वारे स्वतःच्या पीक विमा नोंदणी करू शकतात. योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी, कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन (KRPH) क्रमांक : ९१४४४७ वर उपलब्ध आहे.