गावागावातुन
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
मंचर प्रतिनिधी
पारगाव (का) पोलीस स्टेशन हद्दीमधुन दिनांक १४/०७/२०२४ रोजी बाळासाहेब लालजी बढेकर रा. धामणी ता. आंबेगाव जि. पुणे यांची जारकरवाडी ता. आंबेगाव जि. पुणे येथील कांदयाच्या चाळीतील सुमारे ३६,०००/- रू किंमतीचे कांदे चोरीस गेले होते त्या अनुषंगाने पारगाव का पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ११५/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात पारगाव का पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पारगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे व पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अभंग यांना सदर गुन्हयाचे तपास कामी आदेश दिले होते.या गुन्ह्याचा तपास करत असतात या गुन्ह्यातील चार आरोपींना पकडण्यात पारगाव पोलिसांना यश आले आहे.
दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हा घडले ठिकाणचे तसेच आजुबाजुचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करीत असताना मौजे जारकरवाडी येथील सी.सी.टी. व्ही फुटेज मध्ये एक संशयीत पिकअप आढळून आली होती. सदर पिकअपचा शोधा घेत असताना. बाळासाहेब केरू सुक्रे यांच्या कांदयाच्या पिशव्या हया चोरीस गेल्याचे समजले त्या अनुषंगाने मौजे खडकवाडी ग्रामपंचायत येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर फुटेज मध्ये एक पांढ-या रंगाची पिकअप नं एम. एच. १२ एम. व्ही १३८० यामुधन अज्ञात ४ ते ५ इसमांनी दुकांनाबाहेर ठेवलेल्या कांदयाच्या पिशव्या ह्या नेल्याचे दिसुन आले. त्या अनपुषंगाने लोणी येथील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता सदर आरोपी हे मौजे लोणी येथे दिसुन आले त्या अनुषंगाने सदर पिकअप व आरोपी यांचा शोधा घेत असताना सदरचे आरोपी हे पुन्हा चोरीच्या उद्देशाने मौजे लोणी येथे आल्याची गोपनीय माहीती मिळाली असता. तेथील ग्रामसुक्षा दलाचे जवान यांच्या मदतीने सदरचे आरोपी व पिकअप ही ताब्यात घेतली. सदर आरोपी यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत शिवराम चव्हाण वय. २१ वर्षे मुळ रा. बारामती सध्या रा. पनवेल २) सुनिल दिनकर चव्हाण वय. १९ वर्षे मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ३) दिपक श्रावण राठोड मुळ रा. परभणी सध्या रा. पनवेल ४) हसरत अली सयद अली अनसारी वय. २० वर्षे मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. पनवेल असे असल्याचे सांगीतले
वरील चारही आरोपी याचीकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याबाबत कबुली दिली असुन सदर गुन्हामध्ये वर नमुद आरोपी यांना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आरोपीतांकडे अजुन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत पुन्हा त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी मौजे लाखणगाव येथुन विहीरीच्या प्लेटा चोरी केल्या असल्याबाबत कबुली दिली आहे. सदर गुन्हयातील प्लेटा व कांदा विक्रीतुन मिळालेले एकुण २७,०००/-रू हस्तगत करण्यात आले असुन सदर आरोपींनी पारगाव का पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख साो, पुणे ग्रामीण, मा.अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साो पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे साो खेडे विभाग खेड, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पारगाव (का) पोलीस स्टेशन, पो. हवा. दत्तात्रय जढर, पो. हवा देवानंद किर्वे, पो.ना.शांताराम सांगडे, पो. कॉ.संजय साळवे, पो.कॉ.मंगेश अभंग पो.कॉ.चंद्रकांत गव्हाणे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, ग्रामसुरक्षा दलाचे जवान आकाश खंडागळे, विशाल वाळुंज, संतोष वांळुज यांनी केली असुन चारही आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत.