गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातून अमरनाथ यात्रेसाठी मंगळवारी (ता. १६) १२० भाविक रवाना झाले. त्यातील ३२ जण तालुक्याच्या पूर्व भागातील आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
सुरेश घुले यांच्या नेतृत्वाखाली बाबा अमरनाथ सेवा समिती (मंचर) यांच्या
वतीने दरवर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. पोंदेवाडी, लाखणगाव व सविंदणे या भागातील एकूण ३२ भाविकांना रोडेवाडी फाटा येथे वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल वाळुंज, महेंद्र वाळुंज, संदीप पोखरकर, कुंडलिक पोखरकर, अमोल वाळुंज, अशोक वाळुंज आदी उपस्थित होते.