गावागावातुन

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोननच्या घिरट्या. प्रशासनाने याबाबत खुलासा करावा.नागरिकांमधे भिती.

Published

on

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोननच्या घिरट्या वाढल्या असून. प्रशासनाच्या वतिने कुठलाच खुलासा करण्यात आला नाही.त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा छडा लागला नाही.पोंदेवाडी व शिंगवे या ठिकाणी मंदिरांमध्ये झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून.चोरीच्या भीतीने नागरिकांच्या जवळपास असणारे थोडेफार पैसे आणि सोने नागरिकांनी बँकांमध्ये जमा केल्याचे पहावयास मिळत असून. प्रशासनाने ड्रोन बाबत लवकर खुलासा करावा अशी मागणी नागरिक करत आहे.सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये रात्रीच्या वेळी दहा ते दोन या वेळामध्ये अनेक गावांवर ड्रोन फिरत आहे. याबाबत कुठलाच खुलासा प्रशासनाने केलेला नाही. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाच्या हाती अजून काही लागलेले नाही. त्यामुळे रात्रीचे वेळी चार चार ड्रोन फिरूनही यावत कुठलाच शोध लागत नसलल्याने नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. त्याचप्रमाणे माघील दोन दिवसांमध्ये दोन ठिकाणी मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे भीती अजुनच वाढली आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी तरून जागे राहत असून त्याचा फटका त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे एकंदरीतच आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये या ड्रोन बाबत खुलासा प्रशासन करावा व पोलिसांनी यावर ठोस ॲक्शन घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहे. या ठिकाणी सर्वसाधारणपणे सर्वच शेतकरी वर्ग असून काबाडकष्ट करून ते आपले उत्पन्न घेत असतात व आपल्या कुटुंबासाठी कमावत असतो. परंतु ड्रोनच्या वाढलेल्या घीरट्या दोन ठिकाणी मंदिरामध्ये झालेली चोरी.व पसरत असलेल्या अफवा यामुळे येथील नागरिक भयभीत झाला असून .अनेक नागरिकांनी जवळपास असणारे हजार पाच हजार रुपये सुद्धा बँकेमध्ये जमा केल्याचे पहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे महिलांनी गळ्यातील अर्धा तोळे एक तोळे दोन तोळ्याचे दागिने सुद्धा बँकांमध्ये जमा केले असून.खोटे सोन्याचे दागिने अनेक महिलांच्या गळ्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत नागरिकांमध्ये भीती असून या भितीचा खोलवर परिणाम येथील जनजीवनावर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या ड्रोन वर कारवाई करावी. पोलीस प्रशासनाने छडा लावावा अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलनाची तयारी सुद्धा येथील नागरिक करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version