राजकीय
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी मयूर सरडे
निरगुडसर प्रतिनिधी -राजु देवडे
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) तालुका उपाध्यक्षपदी शिरदाळे येथील मा.उपसरपंच मयूर संभाजी सरडे यांची नुकतीच निवड झाली आहे. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आल्याचे आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकित जाधव यांनी सांगितले यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व्हाईस चेअरमन प्रदीप दादा वळसे पाटील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला बळ देण्याचे काम युवकांच्या मार्फत करणार असल्याचे मयूर सरडे यांनी सांगितले.मयूर सरडे यांनी शिरदाळे ग्रामपंचायत मधे उपसरपंच म्हणून काम केले असुन सध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते काम करत आहेत. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे चांगले काम असुन तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.