गावागावातुन

प्रतीक क्षिरसागर सी.ए. पदी

Published

on

निरगुडसर प्रतिनिधी-राजु देवडे


जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथील प्रतीक ज्ञानेश्वर क्षिरसागर यांची नुकतीच सी.ए. ( सनदी लेखापाल ) परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. प्रतीकचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण जारकरवाडी येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले तद्नंतर पुणे येथील गरवारे कॉलेज पुणे येथे बी कॉम पूर्ण करत असताना प्रतिकने सी.ए.चा अभ्यास सुरू ठेवला होता. त्यात प्रतिकने यश संपादन करुन ग्रामीण भागातील मुलांमोसर एक आदर्श निर्माण केला आहे. प्रतीक चे वडील ज्ञानेश्वर क्षिरसागर व बंधू प्रथमेश क्षीरसागर हे गावात सलून व्यवसाय करतात. सर्वसामान्य कुटुंबातील प्रतिकने हे यश संपादन केल्याने त्याचे जारकरवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version