मनोरंजन
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मंचर येथे जनता दरबार
मंचर प्रतिनिधी
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव-शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी जनता दरबार बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी स.१०.०० वा. शरद पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे उपस्थित राहणार आहेत.
आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी बुधवार दि.१० जुलै २०२४ रोजी स.१०.०० वा. ते दु.०२.०० वा. यावेळेत शरद पवार सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे. या जनता दरबारात विविध शासकीय विभागांचे विभागीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी या जनता दरबारात आपले प्रश्न लेखी स्वरुपात सादर करावेत. सदर जनता दरबार कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे.