गावागावातुन
कु.समीक्षा अश्विनी शरद मखर जिल्ह्यात अबॅकस परीक्षेत प्रथम.
निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे
पोंदेवाडी ता.आंबेगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यीनी कु.समीक्षा अश्विनी शरद मखर या विद्यार्थीनीने पुणे जिल्ह्यात अबॅकस परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवीला.या परीक्षेत एकूण 1075 मुले व मुली सहभागी झाले होते.
पोंदेवाडी येथील कु. समीक्षा अश्विनी शरद मखर हि गावातील माध्यमिक विद्यालयात शिकते.तिने अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या अब्….या या परीक्षेत सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेसाठी जास्त बसत नाहीत.गणित या विषयावर हि परीक्षा घेतली जाते. समीक्षा या परीक्षेत बसली आणि पुणे जिल्ह्यात पहिली आली त्याबद्दल तिचे पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदण करण्यात आले.