गावागावातुन
पूर्व आंबेगावात ड्रोनच्या घिरट्या
निरगुडसर प्रतिनिधी राजु देवडे
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, लाखणगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी आदी गावांमध्ये रात्रीच्या वेळी गेले दोन दिवस ड्रोनच्या गिरट्या सुरू असून रात्री 10:30 नंतर हे ड्रोन कशासाठी फिरतात याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या पुणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी काही गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या वाढल्या आहेत. तसाच प्रकार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर, लाखणगाव पोंदेवाडी खडकवाडी, जारकरवाडी या परिसरात दिसून येत आहे. काठापूर पोंदेवाडी खडकवाडी जारकरवाडी या गावाच्या मध्यभागी असणाऱ्या डोंगराच्या परिसरात विशेष करून हे ड्रोन फिरताना दिसून येतात. या डोंगराच्या चारही बाजूला चार गावे असून याच डोंगराच्या सभोवतालच्या परिसरात या घिरट्या दिसून येत आहेत.त्यामुळे नक्की हे ड्रोन रात्री कशासाठी उडतात याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली आहे. एकावेळी तीन-तीन ड्रोन या परिसरात उडत असल्याने नागरिकांनी एकमेकांना फोन करून याबद्दल माहिती दिली. रात्रीच्या वेळी उडणारे हे ड्रोन उंचीवरून उडत असल्याने या ड्रोनचा आकार व क्षमता जास्त असू शकते. त्यामुळे इतक्या मोठ्या क्षमतेचे ड्रोन या परिसरात का फिरतात याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.
सध्या जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ड्रोनच्या घिरट्या वाढत चालल्या असून या संदर्भात प्रशासनाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नाही. प्रशासनाने या संदर्भात माहिती उपलब्ध करून नागरिकांमध्ये असणारा गैरसमज दूर केला पाहिजे.
आंबेगाव च्या पूर्व भागात गेल्या दोन ते तीन दिवसापासून रात्रीच्या वेळेस ड्रोन फिरताना दिसत आहे साधारण हे हे ड्रोन रात्री साडेदहा नंतर आकाशात फिरतात परंतु हे ड्रोन कशासाठी फिरतात हे मात्र अद्याप समजले नाही. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने यासंदर्भातील माहिती घेऊन नागरिकांमधील भीती दूर करावी.
अनिल वाळुंज मा.अध्यक्ष ख. वि.संघ आंबेगाव